... खरंच मेमरी कमी हाेते का?

वय वाढतं जातं, तसं खरंच मेमरी कमी हाेत जाते का? मेंदुच्या उर्जेचा याेग्य पद्धतीने वापर केल्यास, हे फायदे नक्कीच दिसून येतील.

लहान असताना मेंदू स्पॉन्जसारखा असताे. न्यूराॅन्स वेगाने जुळतात. ५ ते १२ वर्षांचा काळ शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असताे. 

१८ ते २५ या वयात मेंदूचा निर्णय घेणारा भाग (फ्रंटल लाेब) परिपक्व झालेला असल्याने मेंदू रिस्क घेण्यास तयार असताे. या वयात नवीन संधी सहज स्वीकारताे. 

३० नंतर लक्ष केंद्रित करणे, दीर्घकालीन स्मृती अधिक मजबूत हाेतात. वाचन, संवाद साधणं, अभ्यास केल्याने मेंदूचे कार्य चांगले सुरू राहते. 

५० नंतर मेंदू सक्रिय राहण्यासाठी क्रिएटिव्ह कामं, काेडी साेडवणं, राेज नवीन गाेष्टी जाणून घेणं,  मित्रांशी संवाद साधणं आवश्यक आहे. 

वय वाढत जातं, तसं मेंदूचे व्यायाम केले पाहिजेत. त्यासाठी राेज १५ मिनिटं वेगवेगळ्या विषयांचे वाचन करायला हवे. 

मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी पझल्स साेडवा, डायरी लिहा, संगीत ऐका. नवीन लाेकांशी संवाद साधत राहणं महत्त्वाचे आहे. 

राेज ध्यान करायला हवे. ध्यान करणे म्हणजे मेंदूचं डिटाॅक्स. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते. 

सतत शिकणं, उत्सुकता टिकवणं आणि सक्रिय राहणं हेच मेंदूच तारूण्य टिकवतात. वय हा फक्त आकडा आहे. मेंदूची उर्जा सवयींवर अवलंबून असते. 

Click Here