भेसळयुक्त गुळ ओळखण्याच्या ट्रिक्स

आता भेसळयुक्त गुळ ओळखा काही मिनिटांत

आजकाल जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. अगदी तिखटापासून ते मीठापर्यंत एकही असा पदार्थ नाही जो भेसळीपासून वाचला आहे.

बाजारात आजकाल गुळामध्येही भेसळ केली जाते. म्हणूनच, गुळ खरेदी करण्यापूर्वी तो बनावट, भेसळयुक्त आहे की नाही हे कसं ओळखायचं याच्या टिप्स पाहुयात.

ओरिजनल गुळ गडद तपकिरी किंवा सोनेरी तपकिरी रंगाचा असतो. तर बनावट गुळ पिवळा किंवा नारंगी रंगाचा असतो. तसंच बनावट गुळाला चमक जास्त असते.

शुद्ध गुळ खडबडीत आणि चिकट असतो. परंतु, तो हाताला चिकटत नाही. उलटपक्षी, बनावट गुळ गुळगुळती, ओलसर असतो.

बनावट गुळाला गोडवा नसतो. तसंच त्याची आंबटसर चव लागते.

बनावट गुळ ओळखायचा असेल तर एका ग्लासात पाणी घेऊन त्यात गुळाचा खडा टाका. जर गुळ ताबडतोब विरघळला आणि पाण्याचा रंग पिवळा झाला तर तो बनावट गुळ आहे.

सांधेदुखी ते त्वचेच्या समस्या! नाभीत मोहरीचं तेल लावण्याचे फायदे

Click Here