पावसाळ्यात नेहमीच लाकडी दरवाजे, खिडक्या फुगतात आणि मग आता काय? सुताराला बाेलवा काम करून घ्या, पेक्षा हे घरगुती उपाय करा.
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढलेली असते. यामुळे लाकडी दरवाजे, खिडक्या फुगतात. यामुळे अनेकांचा त्रास वाढताे.
दरवाजा फुगला तर ताे नीट बंद हाेत नाही. फट राहाते, कड्या व्यवस्थित बसत नाहीत. यामुळे खूप वेळ या कामांमध्ये जाताे.
दरवाजे, खिडक्या पावसाळ्यात फुगू नयेत, म्हणून काही उपाय नक्कीच करू शकता. यामुळे तुमचा त्रास कमी हाेईल.
तिळाचं तेल आणि लिंबू रस एकत्र करून जिथे दरावाजे, खिडक्या फुगल्या असतील तिथे लावा.
मेणबत्ती दरवाजे, खिडक्यांच्या फुगलेल्या भागावर घासून लावावी. यामुळे फुगलेला भाग व्यवस्थित हाेताे.
घरातले दरवाजे, खिडक्या फुगल्या असतील तर हेअर ड्रायरने वाळवा. त्यातली आर्द्रता कमी झाल्यास फुगवटा कमी हाेईल.
पावसाळ्यात दरवाजे पावसाच्या पाण्याने भिजणार नाहीत, ओले हाेणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.