मिठाई व्यवस्थित स्टोर न केल्यामुळे ती लगेच खराब होते.
घरी एखादा कार्यक्रम असला की गोड पदार्थांची नुसती रेलचेल पाहायला मिळते. परंतु, बऱ्याचदा मिठाई व्यवस्थित स्टोर न केल्यामुळे ती लगेच खराब होते.
गोड पदार्थ वा मिठाई फ्रीजमध्ये कशा पद्धतीने स्टोर करावी याच्या काही टिप्स फूड एक्सपर्ट वृंदा दर्याणी यांनी दिल्या आहेत.
मिठाई फ्रीजमध्ये स्टोर करतांना कधीही मिठाईचा बॉक्स थेट फ्रीजमध्ये आहे तसा ठेऊ नये. फ्रीजमधील गार हवेमुळे मिठाईमधील ओलावा कमी होतो. व ती ड्राय होते.
मिठाई बराच काळ ताजी राहण्यासाठी मिठाईच्या तळाशी बटर पेपर ठेवावा. तसंच मिठाई वरच्या बाजूनेही बटर पेपरने झाकावी.
मिठाई कायम एअर टाइट कंटेनर किंवा काचेच्या भांड्यात ठेवावी.
बर्फी, पेढे, लाडू हे गोड पदार्थ फॉइल वा बटर पेपरने झाकावेत. यामुळे ते १० दिवस छान टिकतात.