बिया साठवून ठेवण्यासाठी काही टिप्स. पाहा काय करायचे. बिया अजिबात खराब होणार नाहीत.
आरोग्यासाठी विविध बिया खाणे फार उपयुक्त असते. जसे की सूर्यफुलाच्या बिया, लाल भोपळ्याच्या बिया, आळशीच्या बिया अशा वेगवेगळ्या बिया खाल्याने अनेक फायदे मिळतात.
या बिया बाजारात सहज विकत मिळतात. मात्र त्या साठवून ठेवताना काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. बिया खराब होऊ नयेत म्हणून व्यवस्थित ठेवायला हव्यात.
बाजारात मिळणाऱ्या कच्च्या बिया घ्या. अख्खी बी असेल तरच घ्या. कोणत्या तरी कंपनीच्या विविध पदार्थ लावलेल्या किंवा मिश्रण बिया घेणे टाळा.
हवाबंद डब्यांमध्ये या बिया ठेवायच्या. त्या उघड्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
बिया कायम फ्रिजमध्येच ठेवायच्या. बाहेर ठेवायच्या नाहीत. असे केल्याने त्या जास्त काळासाठी चांगल्या राहतात.
काचेच्या बरणीत बिया साठवा. प्लास्टिकपेक्षा काचेत बिया जास्त चांगल्या टिकतात.
बिया विकत घेताना ताज्याच विकत घ्या. पॅकेटमधील बिया घेण्याऐवजी सुट्या मिळतात त्या घ्यायच्या.