या सोप्या टेक्निकने कात्रीला येईल धार
बऱ्याचदा वारंवार कात्रीचा वापर केल्यामुळे तिची धार कमी होते.
बोथट झालेल्या कात्रीचा काहीही उपयोग नसतो. त्याच्यामुळे ना कोणती गोष्ट कापली जाते ना अन्य काही उपयोग होतो.
धार नसलेली कात्री टाकून देण्यापेक्षा तिची धार कशी वाढवता येईल याच्या काही टीप्स पाहुयात.
कात्रीला धार लाव्यापूर्वी तेल लावून थोडा वेळ तसंच ठेवा. त्यानंतर कापडाने स्वच्छ पुसून घ्या.
कात्री एखाद्या लोखंडी किंवा स्टीलच्या रॉडवर घासा. जवळपास १०-१५ वेळा कात्री लोखंडी किंवा स्टीलच्या रॉडवर घासा.
जर तुमच्याकडे लोखंडी किंवा स्टीलचा रॉड नसेल तर त्याऐवजी दुसऱ्या एखाद्या कात्रीवर किंवा सुरीवर कात्री घासा.
सँडपेपरवर देखील कात्री घासल्यामुळे कात्रीची धार परत मिळते.