बंद पडलेलं डिमॅट खातं परत कसं सुरू कराल?

शेअर बाजाराच्या कोणत्याही सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्यक्तीकडे डिमॅट अकाउंट असणं अनिवार्य आहे. 

शेअर बाजारात आज गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे याच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करून भविष्यासाठी मोठा फंड तयार केला जाऊ शकतो. 

पण शेअर बाजाराच्या कोणत्याही सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्यक्तीकडे डिमॅट अकाउंट असणं अनिवार्य आहे. या अकाउंटशिवाय तुम्ही शेअर बाजाराच्या कोणत्याही सेक्टरमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. 

अनेक दिवस वापर नसल्यानं डिमॅट अकाउंट बंद पडले असेल तर सहजपणे सुरू करता येतं. त्यामुळे अकाउंट बंद पडले म्हणून घाबरून जाऊ नका.

सध्या अनेक ब्रोकरेज अॅप्स डिमॅट खातं दीर्घ काळासाठी वापरत नसल्यास तो तात्पुरता बंद करून टाकतात. गुंतवणूकदाराद्वारे नोंदवलेली माहिती जुळत नसेल, तर अशा परिस्थितीतही डिमॅट खाते बंद केले जाऊ शकते. 

पॅन कार्ड, आधार कार्ड यांची माहिती डिमॅट खात्याशी जोडली नाही तरसुद्धा हे बंद होऊ शकते. म्हणून आवश्यक कागदपत्रांची माहिती अचूकपणे नोंदवणं आवश्यक आहे. 

डिमॅट अकाउंट बंद झाल्यावर आपण ते सहजपणे रिकव्हर करू शकता. अकाउंट रिकव्हर करण्यासाठी आपल्या ब्रोकरेज कंपनीकडून संवाद साधून रिकव्हरीबाबत माहिती घेऊ शकता. 

कंपन्यांनी अॅपच्या माध्यमातूनही रिकव्हरीची प्रक्रिया सोपी केली आहे.

Click Here