इन्स्टावर तुमचं बनावट अकाऊंट उघडलंय... त्वरित करा हे काम 

तुमचं किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणाचं बनावट इन्स्टा अकाऊंट उघडलंय का...?

इंस्टाग्राम अॅप उघडून तुमच्या नावानं उघडलेल्या बनावट प्रोफाइलला भेट द्या.

प्रोफाईल वरील उजवीकडे असलेल्या तीन-बिंदूंच्या आयकॉनवर टॅप करा.

रिपोर्ट > रिपोर्ट अकाउंट > ते दुसरे कोणीतरी असल्याचे भासवत आहे हा ऑप्शन निवडा.

"मी" किंवा "माझ्या ओळखीचे कोणीतरी" यापैकी योग्य तो पर्याय निवडा.

सूचनांचे पालन करा आणि सबमिट करा.

इन्स्टाग्राम अॅपसोबतच तुम्ही वेबद्वारे देखील रिपोर्ट करू शकता

इन्स्टाग्राम तोतयागिरी अहवाल फॉर्म भरा. तुमची ओळख पडताळण्यासाठी सरकारने प्रसिद्ध केलेला वैध आयडी जसे की पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार इ. अपलोड करा.

इन्स्टाग्राम सामान्यतः काही दिवसांत तोतयागिरी दाव्यांचे पडताळणी करते. इन्स्टाग्रामचा रिस्पॉन्स येण्याची वेळ बदलूही शकते.

बनावट खाती अनेकदा तुमच्या नेटवर्कमधील लोकांना लक्ष्य करतात. पुढील नुकसान टाळण्यासाठी, तुमच्या मित्रांना, सहकाऱ्यांना आणि फॉलोअर्सना ताबडतोब कळवा.

Click Here