ब्रेकअप के बाद..! पार्टनरला विसरण्यासाठी वापरा या ट्रीक
ब्रेकअप झाल्यानंतर काहींना तर आपल्या पार्टनरला विसरणं शक्य होत नाही.
ब्रेकअपचं दु:ख पचवणं प्रत्येकालाच शक्य नसतं. अनेकजण ब्रेकअपमुळे पार डिप्रेशनमध्येही जातात. म्हणूनच, नातं संपुष्टात आल्यानंतर आपल्या पार्टनरला कसं विसरावं हे पाहुयात.
ब्रेकअप झाल्यानंतर अनेकजण जुन्या आठवणींमध्ये अडकून बसतात. काहींना तर आपल्या पार्टनरला विसरणं शक्य होत नाही. ज्यामुळे ते आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत.
तुमच्या पार्टनरला विसरायचं असेल तर सगळ्यात प्रथम स्वत:ला प्रायोरिटी द्या. कारण, दु:खाच्या भरात तुमचं स्वत:कडे दुर्लक्ष होतं. ज्यावेळी स्वत:वर प्रेम करायला शिकाल. त्याचवेळी तुम्ही या दु:खातून सावराल.
ब्रेकअपनंतर जुन्या आठवणींमध्ये रमत बसू नका. जुन्या गोष्टी चुकूनही आठवू नका. जर आठवण येत असेल तर मन दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा.
या दु:खातून सावरायचं असेल तर मनमोकळेपणाने रडा. कारण, मनात गोष्टी ठेवल्यामुळे त्याचा त्रास होतो. त्यापेक्षा रडून मोकळे व्हा. ज्यामुळे तुमच्या मनावरील ओझं हलकं होईल.
ब्रेकअपनंतर इतरांशी संपर्क तोडू नका. त्यापेक्षा नवीन मित्र-मैत्रिणी जोडा. कुटुंबियांना वेळ द्या.