'बिअर प्यायली की किडनी स्टोन बरा होतो', असा समज अनेक लोकांमध्ये आहे. परंतु, खरंच बिअरमुळे किडनी स्टोनची समस्या दूर होते का?
डॉ. प्रियदर्शी रंजन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत किडनी स्टोनच्या व्यक्तींसाठी बिअर पिणं फायद्याचं आहे की तोट्याचं हे सांगितलं आहे.
बिअर प्यायल्यामुळे किडनी स्टोन विरघळतात असं म्हटलं जातं. आणि, या समजापोटीच अनेक जण सर्रास बिअर पितात.
बिअर पिणं हे एक सामान्य पेय आहे. ते किडनी स्टोनवरील औषध नाही हे सगळ्यात प्रथम समजून घ्या. त्यामुळे किडनी स्टोनवर बिअर हा उपचार म्हणून योग्य पर्याय नाही.
बिअरमुळे नैसर्गिकरित्या लघवीचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे किडनी स्टोनचे लहान लहान खडे युरिनच्या मार्फत शरीराबाहेर टाकले जातात.
बिअर प्यायल्यामुळे मूत्रपिंड आणि यकृत या दोघांवर ताण येतो. त्यामुळे जर तुम्हाला किडनी स्टोन बरा करायचा असेल तर बिअरऐवजी नारळ पाणी पिण्यास सुरुवात करा.