हिरवे दिसण्याचा आणि घसरून पडण्याचा धोका...
यंदा पाऊस खूपच बेफाम कोसळला आहे. मे महिन्यापासून धो- धो ओतला आहे.
यामुळे घरांच्या पायऱ्यांवर, सिमेंटच्या कोब्यावर किंवा फरशांवर हिरवा रंग चढला आहे.
हा हिरवा रंग नाही तर ते शेवाळ आहे, ज्यावरून घसरून पडण्याची शक्यता असते.
हे शेवाळ एकदा का सुकले की काहीच करता येणार नाहीय. कारण आता उन पडू लागले आहे.
ते सुकण्यापूर्वी ते घासून काढणे गरजेचे आहे. परंतू, ते काढणार कसे?
5 रुपयांची सफेद पावडर या कामी येणार आहे. जास्त मेहनतही लागणार नाही.
काय करायचे आहे, चुना पावडर घ्यायची आहे. गरजेनुसार तुम्ही खरेदी करू शकता.
चुन्याची पावडर ही अल्कधर्मी असते तर शेवाळ आम्लयुक्त वातावरणात वाढते.
जेव्हा शेवाळावर चुना पडतो तेव्हा शेवाळाच्या पेशी जाळल्या जातात.
चुना एक थर तयार करतो जो ओलावा रोखतो, यामुळे शेवाळ पुढे वाढत नाही.
चुना टाकल्यावर एखादा ब्रश घेऊन काही वेळाने शेवाळावर घासा, काही मिनिटांत तुम्हाला तिथे चकचकीत फरशी, भिंत मिळेल.