महागडी प्रोडक्ट्स वापरुनही अनेकदा हे डार्क सर्कल्स कमी होत नाहीत.
कामाचा अतिताण, अपूर्ण झोप यांमुळे अनेकांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल आल्याचं आपण पाहतो.
बाजारात डार्क सर्कल कमी करणारे अनेक प्रोडक्ट्स, क्रीम सहज उपलब्ध आहेत. मात्र, ही महागडी प्रोडक्ट्स वापरुनही अनेकदा हे डार्क सर्कल्स कमी होत नाहीत.
डार्क सर्कल कमी करणारे असे काही घरगुती उपाय पाहुयात. ज्यामुळे तुमची समस्या नक्कीच दूर होईल. आयुर्वेदिक डॉक्टर मनिषा मिश्रा ३ घरगुती उपाय सांगितले आहेत.
डोळ्याखालील वर्तुळे कमी करण्यासाठी ज्येष्ठमध पावडर हा सर्वोत्तम पर्याय आहे. ज्येष्ठमधाची पावडर पाण्यात मिक्स करुन ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. ज्येष्ठमधामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
बदामाचं तेल लावल्यामुळे सुद्धा डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात. रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने डोळ्याखाली हलक्या हाताने मसाज करा.
रोज ऑइल लावल्यामुळे सुद्धा तुमची समस्या दूर होऊ शकते. या तेलामुळे पिगमेंटेशन आणि कोलेजनची समस्या दूर होते. तसंच त्वचेत ओलावा टिकून राहतो.