तुमच्या मुलाचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी काही महत्वाची पावले उचलू शकता.
तुमच्या मुलाचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी, स्पष्ट मर्यादा निश्चित करा आणि इतर गोष्टींना प्रोत्साहन द्या.
दिवसाच्या किंवा आठवड्याच्या स्क्रीन टाइम मर्यादा निश्चित करा आणि त्यांचे पालन करा.
तुमच्या घरात डायनिंग रूम किंवा बेडरूमसारखे स्क्रीन-फ्री झोन निश्चित करा.
तुमचा स्वतःचा स्क्रीन टाइम कमी करून त्यांच्यासमोर एक उदाहरण ठेवा.
संभाषण आणि कुटुंबातील नातेसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी जेवणाचा वेळ स्क्रीन-फ्री करा.
खेळ, बागकाम किंवा उद्यानात खेळणे यासारख्या आऊट डोअर अॅक्टिव्हिटींना प्रोत्साहन द्या.
तुमच्या मुलांना चित्रकला किंवा हस्तकला यासारख्या क्रिएटिव्ह छंदांमध्ये गुंतवा.
मुलांना इतर गोष्टी करण्यास प्रेरित करण्यासाठी नॉन-डिजिटल रिवॉर्ड्स पद्धत वापरा.
तुमचे मूल वापरत असलेल्या डिजीटल डिव्हाईसचे निरीक्षण करा, ते काय पाहतात याचं मॉनिटरिंग करा.