प्रेम आणि क्रश या दोन वेगवेगळ्या फिलिंग्स आहेत. मात्र, या दोघांमधील अंतर अनेकांना कळत नाही आणि मग तिथेच खरी गल्लत होते.
प्रेम असणं आणि क्रश असणं यात एक पुसटशी रेष असते. म्हणूनच, या दोघांमध्ये नेमका फरक काय ते पाहुयात. ज्यामुळे प्रेमाच्या बाबतीत तुम्ही अपयशी ठरणार नाहीत.
क्रश म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडते. परंतु, तिच्यासोबत रोमॅण्टिक फिलिंग्स कधीच निर्माण होत नाहीत.त्या व्यक्तीकडे पाहून फक्त आपल्याला आनंद होतो.
क्रश असणं म्हणजे त्या व्यक्तीची एखादी गोष्ट आपल्याला आवडणं. ज्यामुळे आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. जसं की, त्यांची हेअर स्टाइल, बोलण्याची पद्धत, पर्सनालिटी.
क्रशच्या विरुद्ध ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडते. त्या व्यक्तीचा एखादा दुर्गुण असेल तर तो सुद्धा आपण सहज स्वीकारतो.
क्रश म्हणजे एखादी व्यक्ती पाहताचक्षणी आवडणे. मात्र, प्रेम म्हणजे हळूहळू त्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे. तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणे.