कलियुगात गुरुशिवाय आपला उद्धार होणार नाही ही खूणगाठ मनाशी बांधून टाका आणि बुवाबाबांच्या गर्दीत खरे गुरु कोणाला मानावे ते जाणून घ्या.
आपला पहिला गुरु आपली आई, जी आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करते आणि आपलं कोण, परकं कोण याची शिकवण देते.
दुसरे गुरु आपले बाबा, समाजातले टक्के टोपणे खाऊन झाल्यामुळे व्यवहार ज्ञान देऊन ते आपल्याला सुज्ञ करतात आणि आपल्या पाठीशी उभे राहतात.
आपले शालेय शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक, जे आपल्याला करिअर घडवण्यासाठी प्रशिक्षण देतात.
ग्रंथ अर्थात पुस्तकं, हेही आपले गुरु, ते आपल्याला ज्ञान देतात आणि न ओरडता, न रागवता सगळ्या गोष्टी समजावून सांगतात.
आजच्या काळात विज्ञाना, तंत्रज्ञान हेही गुरु, त्यांच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यात विकास करू शकतो.
अनुभव, आयुष्यात पावलोपावली आपल्याला शिकवणारा हा शिक्षक आहे. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या अनुभवातून खूप काही शिकता येतं.
काळ आणि वेळ, हे ही गुरु आहेत, प्रत्येकाची वेळ येते आणि वेळ येईपर्यंतचा काळ थांबून राहावं लागतं आणि त्याकाळात शिकत राहावं लागतं.
स्वामी समर्थ, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, शंकर महाराज हे आपले अध्यात्मिक गुरु आहेत, जे आपल्याला मन:शांती देतात.
गुरूंचे गुरु परात्पर गुरु अर्थात दत्त गुरु, आपल्या आयुष्याचा प्रवास संपवून त्यांच्यापाशी जायचे आहे ही शिकवण देणारे दत्त गुरु कलियुगात आपल्याला तारणार आहेत.
या सर्व गुरूंकडून शिकत राहा आणि स्वतःचा उत्कर्ष करा याच गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!