रस्त्यात कुत्र्यांनी घेरलं तर घाबरु नका! सुटका करण्यासाठी वापरा ५ ट्रिक्स

अनेकदा ४-५ कुत्रे एकत्र अंगावर धावतात. अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे पाहुयात.

बऱ्याचदा बाईकवरुन जातांना किंवा चालत असतांना कुत्रे अचानक पाठलाग करु लागतात.

यात अनेकदा ४-५ कुत्रे एकत्र येऊन अंगावर धावतात. अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे पाहुयात.

कुत्रे मागे लागल्यानंतर कधीही त्यांच्यासमोर धावू नका. यामुळे ते आणखीनच पाठीमागे लागतात.

कुत्रे भुंकायला लागल्यावर त्यांना हकलायचा प्रयत्न करु नका. या गोष्टीमुळे ते आक्रमक होतात आणि परिणामी, चावायचा प्रयत्न करतात.

कधीही भटक्या कुत्र्यांच्या डोळ्यात पाहू नये. असं केल्यामुळे ते तुम्हाला शत्रू समजून तुमच्यावर अॅटॅक करु शकतात.

कुत्रे मागे लागल्यावर शांतपणे हळूहळू चाला. ते तुमच्या जवळ आले तर २ मिनिटे थांबा आणि त्यांना हुंगू द्या . थोड्या वेळातच त्यांना तुमच्यापासून धोका नसल्याचं कळत आणि ते निघून जातील.

भारतीय १००० रुपयांची अमेरिकेत किंमत किती?

Click Here