पावसाळ्यात डासांमुळे हाेणाऱ्या आजारांचा धाेका वाढताे. या जागांकडे दुर्लक्ष झाल्यास डेंग्यू हाेण्याचा धाेका तुम्हाला आहे.
तीन दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साचून राहिल्यास डेंग्यूचे डास त्या पाण्यात अंडी घालतात. या ठिकाणी डासांची पैदास हाेते.
घर, ऑफिसमध्ये अनेकजण झाडाच्या कुंड्या ठेवतात. कुंड्यातील पाणी खाली पडू नये म्हणून कुंड्याखाली प्लेट्स ठेवतात, त्यात साचून राहिलेले पाणी धाेकादायक आहे.
सजावटीसाठी घर, ऑफिसमध्ये फ्लाॅवर पाॅट ठेवले जातात. फ्लाॅवरपाॅटमध्ये भरून ठेवलेले पाणी नियममित बदलले जात नाही, या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालू शकतात.
घरात वापरात नसलेल्या वस्तू बाल्कनी, टेरेसवर ठेवल्या जातात, पावसाचे पाणी येथे साचून राहते, या जागेकडे दुर्लक्ष हाेते. उघड्यावर साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात.
Ac मधून बाहेर पडणाऱ्या पाण्याकडे लक्ष दिले जात नाही. हे पाणी अनेकदा डकमध्ये, खिडकीबाहेर अनेक दिवस साचून राहते. पावसाळ्यात या ठिकाणी लक्ष द्यायची गरज आहे.
घरात पाणी साठवण्यासाठी अनेकदा ड्रम, पातेली, पिंप भरून ठेवली जातात. पण, हे भरलेले पाणी नीट झाकून ठेवले जात नाही. झाकण ठेवले असले तरी गॅप राहते.
पावसाचे पाणी घरात येऊ नये म्हणून ताडपत्री, प्लॅस्टिकचा वापर केला जाताे. ताडपत्री एकदा बांधल्यावर त्यात पावसाचे पाणी साचून राहते आहे का नाही, हे पाहणे गरजेचे आहे.
वास्तूशास्त्र किंवा फेंगशुईप्रमाणे काही वस्तू घरात ठेवताना, त्या पाण्यात ठेवल्या जातात. ताटली किंवा वाटीत हे पाणी उघडे ठेवलेले असते. हे पाणीही नियमितपणे बदलणे आवश्यक आहे.
डेंग्यूचे डास हे दिवसा चावतात. डेंग्यूच्या डासांच्या पायावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात.
डेंग्यूची प्रामुख्याने लक्षणे म्हणजे ताप येणे, डाेकेदुखी अशी आहेत. पावसाळ्यात ताप आला तर अंगावर काढू नका. त्वरित डाॅक्टरचा सल्ला घ्या.
डेंग्यूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घर, ऑफिसची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. उघड्यावर साचलेले पाणी दाेन ते तीन दिवसांपेक्षा अधिक काळ साचून राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.