कर्करोग टाळण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
कर्करोग टाळण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करणं गरजेचं आहे.
गेल्या काही काळात कर्करोगाचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. यात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त आहे.
कर्करोग टाळण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करणं गरजेचं आहे. ज्यामुळे आपण कॅन्सरला दूर ठेऊ शकतो.
कर्करोग टाळायचा असेल तर आहारात डाळिंबाचा समावेश करा. डाळिंबामध्ये व्हिटामिन, पोटॅशिअम आणि फायबर यांचं प्रमाण अधिक आहे. तसंच रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
संत्र्यांचं सेवन केल्यास कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबते तसंच त्या पसरण्यापासूनही बचाव होतो. त्यामुळे कर्करोगग्रस्तांना आहारात संत्री, लिंबू यांचं आवर्जुन सेवन करावं.
ब्रोकोलीमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन, क्रूसीफेरस हे संयुग असून ते कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे म्हटलं जाते.
गाजर खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. गाजर खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका 26% कमी होतो . याशिवाय गाजर खाणाऱ्या लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोकाही १८ टक्क्यांनी कमी होतो.