घरच्या घरी ऊस बेणेमळा कसा तयार करावा?

उसाचे अधिक उत्पादन येण्यासाठी ऊस शेतीत बेणे निवड अत्यंत महत्वाची बाब आहे.

घरच्या-घरी ऊस बेणेमळा तयार करण्यासाठी सुरवातीला चांगले गुणधर्म असलेले १० मुलभूत ऊस बेणे (पूर्ण ऊस) निवडा.

निवडलेल्या प्रत्येक उसापासून सशक्त डोळे असणारी २० टिपरी काढून घ्या.

असे केले तर १० उसापासून तुम्हाला २०० टिपरी निघतील.

२०० टिपऱ्यांच्या २०० डोळ्यांपासून पुढे १,००० ऊस तयार होतील.

१,००० उसापासून पुढे तुम्हाला २०,००० एक डोळा टिपरी निघतील.

२०,००० एक डोळा टिपऱ्यातून ४ एकर ऊस लागवड करता येईल.
कमी खर्चात ऊस बेणे तयार होईल.

Click Here