अनेकांना माहिती नसेल, ते चुकीचीच समजतात...
तुम्ही टीव्ही घेताना किंवा नातेवाईकांच्या किंवा मित्र-मैत्रिणींच्या घरी टीव्ही किती मोठा आहे, हे पाहत असाल.
टीव्हीची साईज इंचात मोजली जाते. परंतू, कधी एखादा टीव्ही उंचीला मोठा, लांबीला मोठा असा असतो.
मग तो टीव्ही 55", 65" असे कसे ठरविले जात असेल...
टीव्हीची साईज ही आडवी की उभी मोजतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच...
तुमच्या माहितीसाठी टीव्हीची साईज ही आडवी किंवा उभी मोजली जात नाही.
तर ती तिरपी मोजली जाते. डाव्या बाजुच्या वरच्या कोनापासून ते खालच्या उजव्या बाजुच्या कोनापर्यंत.
यानुसार जेवढी लांबी भरेल ती त्या टीव्हीची साईज असते. अनेकांना हे माहिती नसते.