पुऱ्या केल्यावर कडक-वातट होतायेत?; पुरी टम्म फुगण्यासाठी फॉलो करा या टीप्स

प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी या टीप्स दिल्या आहेत.

कोणताही सणवार आला की प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाच्या पदार्थासोबतच पुरी केली जाते.

अनेकदा घाईगडबडीत पुऱ्या करतांना काही तरी घोळ होतो ज्यामुळे पुऱ्या कडक किंवा वातट होतात.

पुरी टम्म आणि त्यासोबतच मऊ होण्यासाठी काही टीप्स आहेत त्या पाहुयात. या टीप्स प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी दिल्या आहेत.

पुरी करतांना कायम पीठ चाळून घ्यावं. तसंच पीठ मळल्यानंतर कायम ते १० मिनिटे झाकून ठेवावं.

पुऱ्या करायला घेतल्यावर पुन्हा एकदा हलक्या हाताने पीठ मळून घ्या.

पुऱ्या लाटतांना शक्यतो पीठाचा वापर करु नका. त्याऐवजी लाटण्यावर थोडंसं तेल लावून मग पुरी लाटा.

अर्रर्र..! मुंबई अव्वल, पण 'या' गुन्ह्यामध्ये

Click Here