दूध पावडर घरी करणं अगदीच सोपं आहे. विशेष म्हणजे ही पावडर १ ते २ महिने आरामात टिकते.
दूध पावडर म्हणजे काय हे कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही. प्रवासात नेण्यासाठी वा एखादा गोड पदार्थ करण्यासाठी सर्रास दूध पावडरचा वापर केला जातो.
बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडच्या दूध पावडर उपलब्ध आहेत. मात्र, बाजारातून महागाची पावडर विकत आणण्यापेक्षा ती घरीच कशी करायची याची सोपी पद्धत पाहुयात.
दूध पावडर घरी करणं अगदीच सोपं आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्हशिवाय ही पावडर १ ते २ महिने आरामात टिकते.
दूध पावडर घरी करण्यासाठी काही किरकोळ साहित्य लागतं. त्यासाठी १ लीटर फूल क्रीम मिल्क, साखर ३ टेबलस्पून आणि जाड बुडाची कढई इतकंच मोजकं साहित्य लागतं.
जाड बुडाच्या कढईमध्ये दूध घेऊन ते मध्यम आचेवर गरम करा. हे दूध सतत हलवा ज्यामुळे ते तळाला चिकटणार नाही.
दूध व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात साखर टाका आणि दूध घट्ट होईपर्यंत अटवा. जवळपास अर्धा-पाऊण तासानंतर दुधातील पाण्याचा अंश निघून जाईल आणि दूध घट्ट होईल.
मिश्रण व्यवस्थित कोरडं झाल्यावर ते गार करा. त्यानंतर मिक्समध्ये टाकून बारीक ब्लेंडर करा. मिक्सर चालू-बंद करत या पद्धतीने दुधाची पावडर करुन घ्या. ही पावडर हवाबंद डब्यात भरुन ठेवा.