तुम्ही कधी खाल्लंय का सफरचंदाचं लोणचं? एकदा तरी नक्की करा ट्राय
सफरचंदाचं लोणचं ही एक अत्यंत चविष्ट, आंबट-गोड आणि झटपट बनणारी रेसिपी आहे.
लोणचं तयार करण्यासाठी २-३ मध्यम आकाराची सफरचंद, १ चमचा मोहरी, १ चमचा मेथी पावडर, २-३ चमचे लाल तिखट, १/२ चमचा हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, ३ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून लिंबाचा रस/व्हिनेगर वापरा.
सर्वाता आधी सफरचंद नीट धुवून घ्या आणि सालीसह किंवा साल काढून त्याचे लहान-लहान तुकडे करा.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हळद, हिंग आणि लाल तिखट घालून फोडणी द्या.
फोडणी थंड झाल्यावर त्यात सफरचंदाचे तुकडे, मीठ, लिंबाचा रस आणि मेथी पावडर मिक्स करा.