घरीच तयार करा बिअर्ड ऑईल, महागड्या तेलांना करा Bye Bye
१० मिनिटांत तयार करा बिअर्ड ऑईल
बाजारात आजकाल बिअर्ड ऑईलचे अनेक विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, हे बिअर्ड ऑईल खरेदी करण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात.
बिअर्ड ऑईलवर पैसे खर्च करण्यापेक्षा अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात हेच तेल घरी सहज करता येतं.
बिअर्ड ऑईल घरी करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी फक्त नारळाचं तेल आणि रोजमेरी इसेन्शिअल ऑईल या दोनचं गोष्टींची गरज आहे.
एका बाटलीत नारळाचं तेल घ्या. या तेलात रोजमेरी इसेन्शिअल ऑईलचे १० थेंब टाका. तयार झालं तुमचं बिअर्ड ऑईल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी या बिअर्ड ऑईलने दाढीला मसाज करा.
नारळाच्या तेलाप्रमाणेच टी ट्री ऑईलच्या वापरानेही बिअर्ड ऑईल करता येतं.
बदामाच्या तेलात युकेलिप्टस तेलाचे २ थेंब आणि टी ट्री ऑईलचे २ थेंब मिक्स करा. त्यानंतर बाटली चांगली शेक करा. तयार झालं तुमचं बिअर्ड ऑईल.
या तेलाने १५ मिनिटे दाढीला मसाज करा. या बिअर्ड ऑईलमुळे दाढीची वाढ होण्यासोबतच दाढीचे केसही काळे होतात.