ही क्रीम वापरल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो मिळतो.
देवपूजेसाठी वापरलं जाणारं गोकर्णाचं फूल हे आरोग्यासाठीही तितकंच फायदेशीर आहे.
गोकर्णाच्या फुलाच्या चहाचे फायदे सगळ्यांनाच ठावूक आहे. परंतु, याच फुलांमुळे चेहऱ्यावर ग्लोदेखील आणता येतो.
गोकर्णाच्या फुलापासून होममेड फेसक्रीम तयार करता येते. विशेष म्हणजे ही क्रीम वापरल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो मिळतो.
गोकर्णाची क्रीम तयार करण्यासाठी गोकर्णाची ८ ते १० फुले, १ कप गरम पाणी, १ चमचा कॉर्नफ्लोअर, १ टेबलस्पून बदाम तेल, १ चमचा कोरफड रस आणि २ व्हिटामिन ई च्या कॅप्सूल इतकं साहित्य लागतं.
प्रथम गरम पाण्यात फुलं छान उकळून घ्या. त्यानंतर एका वाटीत कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात फुले उकलेलं पाणी अॅड करा. त्यानंतर उर्वरित सर्व साहित्य या पेस्टमध्ये मिक्स करा. ही क्रीम व्यवस्थितरित्या फेटून घ्या.
तयार झालेली फेस क्रीम हवाबंद डब्यात ठेवा. रात्री झोपतांना दररोज चेहऱ्याला लावा.