तुरटीचे टोनर कसे तयार कराल?

महागडे टोनर वापरण्याऐवजी आपण त्वचेसाठी तुरटी वापरु शकतो. 

चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय म्हणून तुरटीचा वापर करतो. महागडे टोनर वापरण्याऐवजी आपण त्वचेसाठी तुरटी वापरु शकतो. 

तुरटीचा टोनर बनवण्यासाठी आपण छोटा तुकडा तुरटी, एक कप पाणी आणि गुलाबजलचे काही थेंब घाला. 

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडीशी तुरटी पावडर विरघळवा. पाणी स्प्रेच्या बाटलीत भरा. यात गुलाबजलचे काही थेंब घाला. 

दररोज तुरटीचे पाणी वापरल्याने त्वचेचा रंग एकसारखा होतो. तसेच त्वचेवरील टॅन कमी होते. त्वचा नैसर्गिकरित्या चमकते. 

तुरटीच्या टोनरमुळे त्वचा घट्ट होते. ज्यामुळे ती अधिक गुळगुळीत होते. छिद्रांमध्ये घाण जमा होत नाही. 

तुरटीमध्ये असलेले अँटी - बॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावरील जंतू नष्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे डाग आणि मुरुमांपासून आराम मिळतो. 

आपली त्वचा अधिक तेलकट असेल तर तुरटीचा टोनर खूप फायदेशीर आहे. हे अतिरिक्त तेल नियंत्रित करते. 

हे टोनर चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. डाग ही जातात. 

Click Here