आपल्यापैकी अनेक घरात सकाळच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते. गरमागरम चहा पोटात गेल्याशिवाय अनेकांचा दिवस काही सुरु होत नाही.
परंतु, बाजारात मिळणाऱ्या चहापतीमध्ये देखील भेसळ असू शकते. त्यासाठी आपण वापरत असणारा चहा पावडर खरा आहे की, खोटा हे कसे समजेल. हे या सोप्या टिप्सवरुन कळेल.
एका ग्लासात थंड पाण्यात दोन चमचे चहापती घालून ती काही वेळ तशीच राहू द्या. जर त्या चहाच्या पानांचा रंग पाण्यात विरघळू लागला आणि त्याचा रंग बदलला तर ती भेसळयुक्त आहे असे समजावे.
टिश्यू पेपरवर काही चहाची पाने ठेवा. त्यावर पाण्याचे काही थेंब घाला आणि नंतर उन्हात ठेवा. टिश्यूवर तेलाचे डाग तयार झाले तर चहा पावडर नकली आहे.
चहाची पाने हातांनी घासून घ्या. जर आपले हात रंगले असतील तर ती बनवाट चहापती आहे असे कळेल.
काही चहाच्या पानांमध्ये हायड्रोजन पेरोक्साइड द्रव घालून काही वेळ थांबा. चहाची पाने खराब दिसू लागली की, भेसळयुक्त आहे असे समजेल.
भेसळयुक्त चहाच्या पानांमध्ये अनेकदा गवत आणि काही कृत्रिम रंग मिक्स केले जातात. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
नकली चहा ओळखण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्याचा सुंगध. चहाच्या पानांना चहासारखा वास येतो. जर येत नसेल तर त्यात भेसळ असू शकते.
चहाच्या पानांची शुद्धता ओळखण्यासाठी ग्लासात पाणी, लिंबाचा रस आणि चहापतीची पाने घाला. पानांचा रंग नारंगी होऊ लागला तर त्यात भेसळ आहे असे समजावे.