कपडे बराच काळ कपाटात ठेवल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रकारचा कुबट वास येतो.
दिवाळीत खरेदी केलेले कपडे बऱ्याचदा पुन्हा फारसे वापरले जात नाहीत. परिणामी, कपाटात ठेऊन ते खराब होतात.
कपडे बराच काळ कपाटात ठेवल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रकारचा कुबट वास यायला लागतो. तसंच कपड्यांच्या रंगावर, कापडावरही त्याचा परिणाम दिसून येतो.
दिवाळीतील कपडे वर्षानुवर्ष नवेकोरे ठेवण्यासाठीच्या काही टिप्स पाहुयात.
कपडे कधीही गरम पाण्यात धुवू नयेत.कारण, यामुळे कपड्यांचा रंग फिका पडायला लागतो. त्यामुळे कपडे कायम गार पाण्यातच धुवावेत.
कपडे धुतांना कायम उलट करुन धुवावेत. ज्यामुळे डिटर्जंटचा परिणाम थेट कपड्यावर आणि त्यावरील डिझायनर वर्कवर होत नाही.
शक्यतो सॉफ्ट, केमिकल फ्री डिटर्जंटचा वापर करुन कपडे धुवावेत. यामुळे कपड्यांचं फॅब्रिक चांगलं राहतं.
कपडे थेट कडक उन्हात वाळवू नये. शक्यतो सावलीत वाळवावेत.