मटार आठवडाभर फ्रेश ठेवण्यासाठी टिप्स
मटार सोलून घ्या. ते धुवू नका. यानंतर कोरड्या काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या एअर-टाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.
मटार झिपलॉक बॅगमध्ये भरून त्यातील हवा पूर्णपणे काढून टाका आणि मग फ्रिजमध्ये ठेवा.
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात १ चमचा साखर आणि थोडे मीठ टाका. ज्यामुळे त्याचा रंग टिकून राहतो.
मटार साठवण्यापूर्वी त्यातील कीड लागलेले, पिवळे पडलेले किंवा अर्धवट फुटलेले दाणे बाजूला करा.
जोपर्यंत तुम्हाला मटार शिजवायचे नाहीत, तोपर्यंत त्यांना पाणी लावू नका. ओलाव्यामुळे बुरशी लागण्याची शक्यता असते.
मटार साठवताना एकाच मोठ्या पिशवीत भरण्यापेक्षा लहान-लहान पाकिटे करा.
एकदा फ्रीजरमधून बाहेर काढलेले मटार पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवू नका.