सावधान! डिजिटल फसवणुकीपासून कसं वाचायचं?
जर तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल, तर तुमची एक छोटीशी चूक सुद्धा महागात पडू शकते. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे.
अनेकदा लोक जास्त लाईक्स आणि फॉलोअर्सच्या हव्यासापोटी स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात.
अनोळखी व्यक्तींकडून येणारे ईमेल आणि मेसेजपासून सावध राहा. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते.
तुमची वैयक्तिक माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नका. पासवर्ड, बँक डिटेल्स किंवा ओटीपी शेअर केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.
इन्स्टाग्रामवर येणाऱ्या फॉलो रिक्वेस्ट आणि मेसेज रिक्वेस्ट काळजीपूर्वक तपासा आणि त्यानंतरच त्या स्वीकारा.
जर तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीवर संशय येत असेल किंवा ती व्यक्ती त्रास देत असेल, तर ते अकाउंट त्वरित ब्लॉक करा. सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचं आहे.