फक्त गाजर अन् बीट नाही, तर या पदार्थांमुळेही दूर होते रक्ताची कमतरता
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळेही अशक्तपणा जाणवू लागतो.
आहारात थोडा जरी बदल झाला तरी अनेकांना अशक्तपणा, थकवा यांसारख्या समस्या जाणवू लागतात.
अनेकदा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळेही अशक्तपणा जाणवू लागतो. म्हणूनच, शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढणारे पदार्थ कोणते ते पाहुयात.
साधारणपणे गाजर,बीट खाल्ल्यामुळे शरीरातील रक्त वाढतं असं म्हटलं जातं. परंतु, असेही काही फळे, भाज्या आहेत ज्यामुळे रक्तवाढीस मदत मिळते.
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी मनुका हे सर्वोत्तम ड्रायफ्रूट आहे. यामध्ये लोह, तांबे आणि व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत मिळते.
खजूर खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास मदत मिळते. तसंच शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यासाठी खजूर एक चांगला स्रोत मानला जातो.
रोज ५ ते ६ जर्दाळू खाल्ल्यास ॲनिमियाची समस्या कमी होऊ शकते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
अंजीरमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, लोह, तांबे, व्हिटॅमिन-बी आणि इतर खनिजे आढळतात. याचे सेवन केल्याने अशक्तपणापासून मुक्ती मिळते.