धावण्याचा व्यायाम करताना हळूहळू धावण्याचा वेग कसा वाढवायचा, त्याचा फायदा काय?
इंटरवल ट्रेनिंग करा, ज्यात वेगवान धावणे आणि नंतर हळू जॉगिंग किंवा चालणे यांचा समतोल राखा.
लांबचा पल्ला धावत असताना २०-३० सेकंदांच्या स्प्रिंट मारून वेग वाढवा.
हलके आणि आरामदायक रनिंग शूज वापरा ज्यामुळे पायांवर कमी ताण येतो.
रोज स्किपिंग (रोपस्किपिंग) करा, जे हृदयासाठी चांगले असून पाय आणि तुमचा कोर मजबूत करतो.
पुश-अप्स, स्क्वॅट्स, लंजेस यांसारखे स्ट्रेंथ ट्रेनिंग करून धावण्याची गती वाढवा.
सरावात सातत्य ठेवल्यास धावण्याची गती आणि स्टॅमिना दोन्ही सुधारता येतो.