दारु स्वस्त मिळते म्हणून तुम्ही खरेदी करत असाल हीच स्वस्तातली दारु तुमच्या मृत्यूचं कारण बनू शकते.
आज जगात मद्यप्रेमींची कमी नाही. अनेक जण पार्ट्यांमध्ये किंवा मित्रपरिवारासोबत सर्रास मद्यप्राशन करतात.
तुम्ही पित असलेली दारु की ओरिजनल आहे की भेसळयुक्त याचा कधी विचार केलाय का? आज समजून घेऊयात की भेसळयुक्त दारु कशी ओळखायची.
दारु स्वस्त मिळते म्हणून जर तुम्ही ती खरेदी करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, हीच स्वस्तातली दारु तुमच्या मृत्यूचं कारण बनू शकते.
तुम्ही खरेदी केलेल्या दारुच्या बाटलीचं झाकण सैल किंवा त्यावरील लेबल व्यवस्थित नसेल तर ती भेसळयुक्त दारु आहे. कारण, ओरिजनल दारुच्या बाटलीवरील लेबलवर स्पष्ट प्रिंट असते.
दारुचे काही थेंब हातावर घेऊन दोन्ही हाताने ते रगडा. हात रगडल्यानंतर जर केमिकलसारखा उग्रवास येत असेल तर त्यात भेसळ झाली आहे.
दारु खरेदी केल्यावर कायम त्याच्यावरील क्युआर कोड स्कॅन करुन पहा. तसंच दारु खरेदी केल्यावर बील घ्यायला विसरु नका. यामुळे वेळप्रसंगी तुम्हाला तक्रार करतांना त्याचा उपयोग होईल.
फ्रीजमध्ये ठेवू नका 'हे' चार पदार्थ, शरीरासाठी आहेत घातक