तिरंग्याशी संबंधित १० नियम; जाणून घ्या

तिरंगा हा आपल्या भारताच्या अभिमानाचे प्रतीक आहे. 

भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा देशाच्या एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. तिरंग्याबाबत काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा अपमान होणार नाही. 

भारतीय ध्वज संहिता २००२ मध्ये तिरंग्याच्या वापरासाठी आणि प्रदर्शनासाठी नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते.


तिरंग्याचा भगवा रंग नेहमी वर आणि हिरवा रंग खाली असावा. तो उलटा फडकवणे ध्वजाचा अपमान आहे.


फाटलेला  किंवा खराब झालेला तिरंगा फडकावू नये. असा ध्वज आदरपूर्वक नष्ट करावा.


तिरंगा जमिनीवर ठेवू नये किंवा तो पाण्यात बुडवू नये. तो नेहमी उंच ठिकाणी ठेवावा.


तिरंगा नेहमी इतर ध्वजांपेक्षा उंच फडकावावा. तो इतर कोणत्याही ध्वजाखाली ठेवता येत नाही.


तिरंग्याचा वापर कपडे, पडदा किंवा सजावट म्हणून करू नये. हा ध्वजाचा अपमान मानला जातो.


सकाळी तिरंगा फडकवल्यानंतर सूर्यास्तावेळी खाली उतरुन ठेवावा.


कोणत्याही व्यावसायिक जाहिराती, ब्रँड लोगो किंवा प्रचारात्मक साहित्यात तिरंगा वापरू नये.


जुना किंवा खराब झालेला तिरंगा जाळून किंवा पुरून त्याची आदरपूर्वक विल्हेवाट लावा. तो कचऱ्यात टाकू नका.

Click Here