मित्राला उधारीवर पैसे देतांना लक्षात ठेवा हे मुद्दे
मैत्रीमध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये पैशांचा व्यवहार आला की त्या नात्यात वितुष्ट येतं. यात उधारीवर घेतलेले पैसे वेळात मिळाले नाही तर वादविवादाला तोंड फुटतं.
मित्रासोबत आर्थिक व्यवहार करतांना तुमची फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
अनेकांना मैत्रीसाठी वाट्टेल ते करायची सवय असते. यात काही जण त्यांच्याकडची सगळी जमापूंजी मित्राला देतात. आणि, ऐनवेळी स्वत:ची पंचाईत करुन घेतात.
मित्राला पैसे देण्यापूर्वी तुमची आर्थिक स्थिती, तुमची एकूण मिळत याचा सारासार विचार करुन मगच पैसे द्या.नाही तर, ऐनवेळी तुम्हालाच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागेल.
आर्थिक व्यवहार करतांना कायम तो लिखित स्वरुपात किंवा UPI, बँकेच्या माध्यमातून करावा. ज्यामुळे तुमच्याकडे त्याचा पुरावा राहतो. कधीही शब्दावर, वचनावर व्यवहार करु नये. यात तुमच्याकडे पुरावा रहात नाही.
जर तुम्हाला घेतलेले पैसे ठराविक वेळात देणं शक्य होत नसेल तर संबंधित व्यक्तीला त्याविषयी सांगा. त्याच्याशी बोलणं टाळू नका. यामुळे नात्यात वितुष्ट येऊ शकतं.
तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवायचे असतील तर नम्रतेने समोरच्या व्यक्तीला त्याविषयी आठवण करुन द्या.