बंगला असो की फ्लॅट सजविलेले घर या बाहेरून पाणी मारण्यामुळे विद्रुप दिसायला लागते.
पावसाळा सुरु झाला आहे, आता घरांच्या भिंती ओल पकडायला लागल्या असतील.
काजळी पकडणे, पापडी धरणे नंतर रंग किंवा सिमेंटच उखडणे असे प्रकार होतात.
यातच तिथे विषाणू आणि किडे वाढू लागतात. बुरशीही लागते.
हे पाणी शोषून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील मीठ खूप मदत करते.
मोठे मीठ घ्यावे, ते एका वाडग्यात ठेवावे. जिथे हे पाणी मारण्याचा किंवा ओलाव्याचा प्रकार आहे तिथे ते ठेवावे.
मीठाने पाणी शोषून घेतले की ते ओले होईल, मग ते बदलावे.
बेकिंग सोडा देखील तुम्ही ट्राय करू शकता. तो देखील ओलावा शोषून घेण्यास सक्षम आहे.
याचबरोबर तुम्ही हे मीठ एका कपड्यात गुंडाळूनही जिथे भांडे ठेवू शकत नाही तिथे ठेवू शकता.
मीठाची ही क्षमता वाढवायची असेल तर तुम्ही कोळसा देखील मीठासोबत वापरू शकता.