हाताला येणारा कांद्याचा वास कसा घालवायचा?

कांदा कापल्याने तुमच्या हातांना दुर्गंधी येऊ शकते.

कांदा कापल्याने तुमच्या हातांना दुर्गंधी येऊ शकते. त्यापासून मुक्त होण्याचे काही सोपे मार्ग जाणून घ्या.

स्टेनलेस स्टीलचा वापरः कांदे कापल्यानंतर, स्टेनलेस स्टीलच्या भांड्याला हात घासा.

लिंबाचा रसः कांदा कापल्यानंतर लिंबाच्या रसाने हात धुवा, त्यामुळे दुर्गंधी दूर होईल.

बेकिंग सोडाः बेकिंग सोड्यात पाणी घालून, ती पेस्ट हातांवर लावा आणि धुवा, वास निघून जाईल.

कॉफी ग्राउंड्सः ग्राउंड कॉफी बीन्सने हात घासून घ्या, ते एक नैसर्गिक दुर्गंधीनाशक आहे.

व्हिनेगरः तुमचे हात काही वेळ व्हिनेगरमध्ये बुडवा आणि नंतर स्वच्छ  धुवा.

कांदे कापण्याआधी काही वेळ पाण्यात भिजवा, यामुळे वासही कमी होतो.

या उपायांनी कांद्याचा वास सहज निघून जाईल आणि स्वयंपाकघरही फ्रेश राहील.

Click Here