पालींना पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय

भिंतींवर रेंगाळणाऱ्या पालींचा पुन्हा होणार नाही त्रास!

प्रत्येकाच्याच घरात पालींचा धुमाकूळ बघायला मिळतो. घरातील भिंतीवर पाल दिसली तरी लहानांसोबतच मोठ्यांनाही भिती वाटते. 

कधी कधी तर पाल ही आपल्या कपड्यांमध्येही जाते आणि मग ती काढायची कशी प्रश्न पडतो. 

अशात आज आम्ही तुम्हाला घरातील पाल कशी पळवून लावायची याचे काही घरगुती टिप्स देत आहोत.

घराच्या दारांमध्ये किंवा खिडक्यांमध्ये फटी असल्यास त्या सीलर किंवा टेपच्या मदतीने बंद करा. पाल याच लहान फटींमधून घरात प्रवेश करतात.

घरातील ज्या ठिकाणी पाल वारंवार येतात, तिथे कांद्याचे काही तुकडे किंवा लसणाच्या पाकळ्या ठेवून द्या. पालला कांद्याचा आणि लसणाचा वास अजिबात सहन होत नाही.

खिडक्या आणि दारांना शक्य असल्यास जाळी (Net) लावा. यामुळे पाल घरात प्रवेश करू शकणार नाही

ज्या कोपऱ्यात पाल वारंवार दिसते, तिथे डांबर गोळ्या ठेवा.

पाल प्रामुख्याने कीटक खाण्यासाठी घरात येतात. त्यामुळे घरात स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे.

Click Here