१९व्या वर्षी ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण कसं मिळवाल, कोणती आहे स्कीम?

पोस्टल लाइफ इन्शुरन्स (पीएलआय) ही भारतातील सर्वात जुनी जीवन विमा सेवा आहे, जी १०० वर्षांहून अधिक काळ कुटुंबांना सुरक्षा कवच प्रदान करीत आहे.

तुम्ही वयाच्या १९ व्या वर्षापासून त्यात सहभागी होऊ शकता आणि ५० लाख रुपयांपर्यतचे विमा कवच मिळवू शकता.

सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वय आणि गरजेनुसार पॉलिसी उपलब्ध आहे, जी सुरक्षा तसेच बोनस आणि कर लाभ देते. देशभरातील १.६५ लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये सहज उपलब्ध आहे.

यामध्ये विमा रक्कम २०,००० ते ५० लाख रुपयांपर्यंत आहे. १९ ते ५५ वर्षे वयोगटातील लोक तो घेऊ शकतात. ४ वर्षांसाठी हप्ते जमा केल्यानंतर कर्जाची सुविधादेखील आहे.

ही पॉलिसी आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांनुसार संरक्षण प्रदान करते. तुमची पॉलिसी वयाच्या ३५, ४०, ५० किंवा ६० व्या वर्षी परिपक्व होते. विमा रकमेसह बोनसदेखील देते.

पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला संपूर्ण रक्कम मिळते. या पॉलिसीमध्ये विमा संरक्षणासह बचत घटकदेखील समाविष्ट आहे.

यात पालकांसोबत कोणतीही घटना घडली तरी मुलाला संपूर्ण विमा संरक्षण मिळते आणि प्रीमिअम भरण्याची आवश्यकता नसते. विमा मॅच्युअर झाल्यावर, मुलाला हमी रक्कम मिळते. यात दोन मुलांचा विमा काढता येतो.

केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?

Click Here