कॉफीवर छान फेस यावा यासाठी नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या ट्रिक्स वापराव्यात पाहा.
कॅफेमध्ये गेल्यावर मिळणारी घट्ट, फेसाळती, मखमली कॉफी पाहून नेहमीच प्रश्न पडतो की, अशी कॉफी घरी का होत नाही?
घरी कितीही प्रयत्न केला तरी कॉफीवर तो हवा तसा फेस (Froth) येत नाही.
एका प्लास्टिक बाटलीत कॉफी, साखर आणि थोडे कोमट पाणी घालून १ मिनिट जोरात हलवा बस्स, तयार होईल प्रचंड फेस!
एका वाटीत १ चमचा कॉफी आणि २ चमचे साखर घ्या. थोडे कोमट पाणी टाकून काटा चमच्याने जोरात फेटा, जोपर्यंत त्याचा रंग फिकट तपकिरी होत नाही.
कॉफीवर फेस येण्यासाठी दूध नेहमी चांगले उकळलेले असावे. गरम दूध उंचावरून कपमध्ये ओतल्याने नैसर्गिक फेस तयार होतो.
कोल्ड कॉफी बनवताना मिक्सरमध्ये बर्फ, दूध आणि कॉफी टाकून 'पल्स' मोडवर फिरवा. यामुळे वर जाड फेसाचा थर तयार होईल.
स्किम्ड दूधापेक्षा फुल क्रीम दूध फेसाळती कॉफी तयार करण्यासाठी फायदेशीर असते.
कॉफी आणि साखर फेटताना त्यात एक छोटा बर्फाचा खडा टाका. बर्फामुळे साखरेचे घर्षण वाढते आणि कॉफीचा फेस येतो.
कॉफी करताना पाणी नेहमी कोमट असावे. उकळत्या पाण्यामुळे कॉफी जळते आणि फेस येत नाही, तर कोमट पाण्यामुळे कॉफी छान 'फ्लफी' होते.