YouTube सिल्व्हर बटण कसे मिळवायचे? 

Silver Play Button: YouTube ने कमाई करण्यासोबतच क्रिएटर्सना ओळखही निर्माण करुन दिली आहे.

Silver Play Button: YouTube केवळ व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म नाही, तर ते कंटेट क्रेएटर्सना त्यांच्या कामासाठी सन्मानितही करते. 

YouTuber एक विशेष सबस्क्राइबर टप्पा ओलांडतो, तेव्हा त्याला क्रिएटर अवॉर्ड किंवा प्ले बटण मिळतेते. यात सर्वात लोकप्रिय 'सिल्व्हर प्ले बटण' आहे. 

सिल्व्हर बटण ट्रॉफीसारखे असून, प्रीमियम फिनिशसह येते. त्याच्या मध्यभागी YouTube लोगो असतो आणि चॅनेलचे नाव लिहिलेले असते.

YouTube वर 100,000 (एक लाख) सबस्क्राइबर पूर्ण होताच क्रिएटरला सिल्व्हर बटणचा हक्कदार मानले जाते. परंतु फक्त सबस्क्राइबरची संख्या पूर्ण करणे पुरेसे नाही.

YouTube च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वे, सेवा अटी आणि कॉपीराइट नियमांचे चॅनेलला पालन करावे लागते. एक लाख सबस्क्राइबर होताच YouTube तुमच्या चॅनेलची समीक्षा करते. 

तुम्ही कोणतेही नियम मोडले आहेत का, बनावट सबस्क्राइबर वाढवले ​​आहेत का, किंवा कॉपीराइटचे उल्लंघन केले आहे का ते तपासते. यासाठी चॅनेल सक्रिय असले पाहिजे.

तुम्ही पात्र असाल, तर YouTube तुमच्या चॅनेलच्या डॅशबोर्डवर एक सूचना पाठवते ज्यामध्ये रिडेम्पशन कोड असतो. यानंतर तुम्हाला वेबसाइटवर जाऊन पत्ता आणि इतर तपशील भरावे लागतील.

यानंतर, काही आठवड्यांत सिल्व्हर बटण तुमच्या घरी पोहोचवले जाईल. YouTube चे सिल्व्हर बटण हे केवळ एक ट्रॉफी नाही तर तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि सातत्याचे प्रतीक आहे. 

Click Here