पावसाळ्यात बऱ्याचदा कॉफी बरणीच्या तळाशी चिकटून राहते. आणि, ती काढतांना नाकीनऊ येतात.
चहा इतकंच सर्रास प्यायलं जाणारं पेय म्हणजे कॉफी. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात कॉफी आवर्जुन असते.
बरणीच्या तळाशी चिकटलेली कॉफी कशी मोकळी करावी याच्या काही टीप्स पाहुयात.
कॉफीची पावडर तळाला चिकटली असेल तर चमच्याच्या मागच्या टोकाने हळूवार पद्धतीने ती उकरुन काढण्याचा प्रयत्न करा. हळूहळू कॉफी मोकळी होईल.
ज्या बरणीत कॉफी चिकटली आहे, ती बरणी काळ उन्हात ठेवा. किंवा, मायक्रोव्हेवमध्ये तिला थोडावेळ ठेऊन कोरडी करा.
कॉफीच्या बरणीत कोमट पाणी टाकून बरणी ३-४ वेळा हलवा. यामुळे बरणीतील कॉफी मोकळी होईल. तसंच हे कॉफी वॉटर तुम्ही इन्स्टंट कॉफी करण्यासाठी वापरु शकता.
तवा गरम करुन त्यावर एक प्लेट ठेवा आणि त्या प्लेटमध्ये कॉफीची बरणी वा बाटली काही वेळा ठेवा. ज्यामुळे कॉफीमधील ओलावा कमी होऊन ती सुटेल.
कॉफीमध्ये गुठळ्या झाल्या असतील तर एकदा ही कॉफी मिक्समध्ये फिरवून घ्यावी.