अनेकवेळा आपल्याला खरे मित्र कोण अन् एक हेतू मनात ठेवून जवळ आलेली व्यक्ती कोण कळत नाही.
सामाजिक कार्यक्रमात सामील झाल्याशिवाय आपलं फ्रेंड सर्कल तयार होत नाही.
तसंच कोणासोबतही मैत्री करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागतो. अन् आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागतं.
मात्र अनेकवेळा आपल्याला खरे मित्र कोण अन् एक हेतू मनात ठेवून जवळ आलेली व्यक्ती कोण यातला फरक करणं अवघड जातं.
तुमचे खरे विचार आणि भावना शेअर करा, मैत्रीचं नातं दृढ होण्यासाठी, अधिक घट्ट होण्यासाठी खुलेपणा गरजेचा असतो.
अशा व्यक्ती शोधा जे कठीण काळात साथ देतील, तुमचे यश साजरे करतील आणि कोणत्याही परिस्थिती प्रामाणिक असतील.
खऱ्या मैत्रीत संवाद आणि एकमेकांसोबतच्या अनुभवांना प्राधान्य असतं; खरी मैत्री प्रयत्नांनी वाढते.
खरा मित्र तुम्हाला जज न घेता स्वीकारतो, तुमच्या वाढीला प्रोत्साहन देतो आणि तुम्हाला स्वतःसारखे राहू देतो.
मैत्रीत दोन्हीकडून समान योगदान मिळतंय का याची खात्री करून घ्या, मैत्री ही दोन्ही बाजूनी असावी.
विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. विश्वासार्हता, गोपनीयता आणि चांगल्या संगतीकडे लक्ष द्या.
निरोगी मैत्री दोन्ही लोकांना यशस्वी होण्यास आणि एकमेकांच्या यशाचे टप्पे साजरे करण्यास मदत करते.