शरीरातील ओमेगा-३ची कमतरता कशी ओळखायची, लक्षणे कोणती? 

ओमेगा-्३चे प्रमाण कमी आहे का हे कसे ओळखाल? पाहा सामान्य लक्षणे.

महिलांमध्ये अनेक पोषणतत्वांची कमतरता सतत निर्माण होत असते. त्यापैकीच एक म्हणजे ओमेगा-३ ची कमतरता. 

ओमेगा-३ ने परिपूर्ण असणारे पदार्थ प्रत्येकाच्या आहारात असतातच असे नाही. त्याकडे आपण जास्त लक्षही देत नाही. 

ओमेगा-३ ची कमतरता असेल तर ती ओळखण्यासाठी ही काही लक्षणे असतात. तुम्हालाही असे त्रास होतात का?

त्वचा पांढरी पडते. त्वचेवर विचित्र सुरकुत्या दिसायला लागतात. केसात कोंडा होतो आणि केस मधोमध तुटायला लागतात. 

विस्मरणाचे प्रमाण वाढते. काहीही लक्षात राहत नाही. साध्या गोष्टी, रोजची कामे एखाद्याचे नाव विसरायला होते. 

अशक्तपणा जाणवतो. आळसावल्यासारखे वाटायला लागते. काम करताना किंवा काहीही करताना उत्साह जाणवत नाही. 

सतत चिडचिड होते. तसेच काहीही कारण नसताना रडावेसे वाटते. भावनांचा गोंधळ उडून जातो.

डोळे कोरडे पडतात. डोळे चुरचुरतात. डोळ्यांवर ताण येतो. 

सांधेदुखी वाढते. थोडी जरी चालले किंवा काही काम केले की सांध्यांना त्रास होतो. 

Click Here