हिरवी मिरची कच्ची खावी की तळून? 

कशाप्रकारे मिरची खाल्ल्याने होतो शरीराला फायदा

भारतीय लोक तिखट खाण्याचे बरेच शौकिन आहेत. त्यामुळे त्यांच्या आहारात मिरची, मसाले यांचा पुरेपूर समावेश असतो.

अनेक लोक जेवणासोबत हिरवी मिरची कच्ची चावून खातात. परंतु, मिरची खाण्याची योग्य पद्धत कोणती हे अनेकांना ठावूक नाही.

काही जण तळलेली मिरची खाणं पसंत करतात. तर, काहींना कच्ची मिरची आवडते. मात्र, कशाप्रकारे मिरची खाल्यास त्याचा शरीराला फायदा होतो ते समजून घेऊयात.

मिरची तळून खाल्ल्यामुळे तिला एक छान खरपूस चव येते.

वडापावसोबत सर्रास तळलेली मिरची मिळते. या मिरचीमुळे पदार्थाची चव वाढते.

मिरची खाण्याची योग्य पद्धत म्हणजे ती कच्चीच खावी.

कच्च्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर यांचं प्रमाण जास्त असतं. 

जर कच्ची मिरची खाण्यास तिखट लागत असेल तर ती थोडीश भाजून खावी.

एका दिवसात नेमके किती केस गळणे नॉर्मल? 

Click Here