ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही किरकोळ गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.
रक्तातील साखर वाढली तर त्याचा परिणाम हा सगळ्या शरीरावर होतो. म्हणूनच, बल्ड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त धान्यांचा समावेश करा. यात ब्राऊन राईस, क्विनोओ, बाजरी, ज्वारी,नाचणी यांचा आवर्जुन समावेश करा.
पालक, मेथी, कोथिंबीर या हिरव्या पालेभाज्या खा.
मोड आलेले कडधान्य, कच्चा भाज्या, फळे नक्की खावीत.
वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, सुकामेवा, बिया, टोफू यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.
गोड पदार्थ, मैदा, साबुदाणा, तेलकट पदार्थ यांचं सेवन टाळा.