अलीकडच्या काळात चुकीच्या आहारपद्धती आणि बदलत्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढीची समस्या उद्भवत आहे.
कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रमाण प्रत्येक वयोगाटात आढळून येत आहे, जे अनेक प्रकारच्या आजारांचे कारण बनत आहे.
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर औषध घेऊन ते कमी करण्यापेक्षा ते वाढण्याआधीच आयुर्वेदाच्या मदतीने ते नियंत्रणात आणण्याचे उपाय जाणून घेऊया.
लसूण : लसणामधील एलिसीन नामक घटक कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतो.
रोज सकाळी अंशपोटी लसणाच्या दोन कच्च्या पाकळ्या चावून खा आणि वरून कोमट पाणी प्या. चव उग्र असली तरी परिणाम लाभदायी ठरतात.
धणे : धन्यांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणास मदत होते.
रोज रात्री दोन चमचे धणे आणि एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी तेच पाणी उकळून, गाळून प्या.
मेथी दाणे : मधुमेहाबरोबरच कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठीही मेथीच्या दाण्यांचा उपयोग होतो.
एक चमचा मेथी दाणे रात्रभर ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी ते पाणी उकळून, गाळून प्या.
अर्जुनाच्या झाडाचे साल : या आयुर्वेदिक झाडाची साल शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल विघटित करण्यास मदत करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.
अर्जुनाच्या झाडाचे साल, मेथी दाणे आणि त्रिफळा चूर्ण यांची पावडर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
या उपायांबरोबरच आहारावर नियंत्रण आणि सात्त्विक आहाराचे सेवन, तणावमुक्त जीवन ही निरोगी आयुष्याची त्रिसूत्री आहे हे लक्षात ठेवावे.