कमी खर्च व कमी कष्टात टाकीची सफाई 

उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न रोजचाच, एक दिवसाआड येणारे पाणी आणि टाकीत साठणारे मचूळ पाणी, यावर जाणून घ्या उपाय!

प्रत्येक घरात पाण्याची तजवीज म्हणून टाकीची सोय केलेली असते, ज्यात पाण्याचा साठा केला जातो. 

त्या पाण्याचा वापर होतो आणि वरचेवर भर पडत राहते, त्यामुळे टाकीचा आतला भाग गुळगुळीत होतो आणि मातीचा थर जमू लागतो. 

मोठमोठ्या आणि उंचावर ठेवलेल्या टाक्यांमध्ये उतरणे, स्वच्छ करणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही. 

काही लोक पैसे खर्चून माणसं बोलावून घेतात आणि टाकी स्वच्छ करवून घेतात. 

कारण तसे न केल्यास पाण्यातून रोगराई निर्माण होण्याची शक्यता असते आणि दूषित पाण्यामुळे आजार वाढू शकतात. 

पण तुम्हाला कमी कष्टात आणि कमी खर्चात टाकी साफ करायची असेल तर जाणून घ्या सोपा उपाय.

त्यासाठी बादलीभर पाण्यात १५-२० ग्रॅम तुरटीची पावडर टाका आणि ते मिश्रणाचे पाणी टाकीत ओता. 

त्यानंतर एक चमचा ब्लिचिंग पावडर टाकून ते पाणी अर्धा तास राहू द्या, ब्लिचिंग पावडरने सगळा गुळगुळीतपणा निघून जाईल. 

अशा रीतीने टाकी स्वच्छ केल्यावर सहा महिने टाकी धुवावी लागणार नाही आणि पाणी गढूळदेखील होणार नाही. 

Click Here