Puffer Jacket ला आता गरज नाही ड्राय क्लीनची!

Puffer Jackets होईल घरीच स्वच्छ, वापरा या टिप्स

हिवाळा सुरु झाला की प्रत्येक जण उबदार कपडे वापरायला सुरुवात करतो. यात बाजारात सध्या स्वेटरचे अनेक वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात.

सध्या तरुणाईमध्ये स्वेटर्सचे अनेक नवनवीन प्रकार लोकप्रिय होत आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे Puffer Jackets.

बाहेरुन फुललेलं आणि आतून तितकचं उबदार असलेलं हे Puffer Jackets जितकं ट्रेंडी दिसतं तितकेच ते स्वच्छ करणं अवघड आहे.

Puffer Jackets साधारणपणे ड्रायक्लीन केलं जातं. मात्र, काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुम्ही घरीदेखील हे जॅकेट स्वस्तात स्वच्छ करु शकता.

जॅकेटवर कोणता डाग लागला असेल तर त्यावर कलरलेस डिटर्जेंटचे २-३ थेंब टाका. त्यानंतर हलक्या हाताने हा डाग रगडून थोडावेळ डिटर्जेंट तसंच ठेवा. त्यानंतर हे डिटर्जेंट धुवून टाका.

Puffer Jackets खरेदी करतांना शक्यतो मशीन वॉश असलेलं खरेदी करावं. यामुळे तुम्ही घरीच ते वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकता. मात्र, हे धुण्यापूर्वी त्याची चेन बंद करायला विसरु नका.

हे जॅकेट कडक उन्हात वाळवावं. कारण, ते जाड असल्यामुळे लवकर वाळत नाही. तसंच ओलसर राहिल्यास त्याला कुटब वास येऊ शकतो.

सतत पेन किलर घेताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

Click Here