मळकटलेला स्विचबोर्ड कसा चमकवाल; ओल्या कपड्याने..., मुळीच नाही...

बहुतांश जण हीच चूक करत असतील, या तीन ट्रिक...

घर जुने असो की नुकतेच एक-दोन वर्षांपूर्वी बांधलेले, लाईटची बटणांचा बोर्ड हा मळलेलाच असतो. 

आतून-बाहेरून आल्यावर लगेचच आहे तशाच हातांनी बटणे दाबली जातात. यामुळे हाताचा मळ हळूहळू त्यावर जमू लागतो. 

त्यावर वेळीच लक्ष दिले नाही तर तो एवढा काळाकुट्ट होतो की अख्खा बोर्डच घाणेरडा दिसायला लागतो.

हा बोर्ड स्वच्छ कसा करायचा? तुम्ही ओल्या फडक्याने करत असाल तर नाही...

तुम्ही घरातील या वस्तू वापरून स्विच बोर्ड पुन्हा नव्यासारखा चमकवू शकता. 

आजकाल मशेरी कोणी वापरत नाही, सर्वच घरांत टुथपेस्ट असते. ती केवळ दात चमकवायच्या कामी नाही तर स्विचबोर्डही साफ करू शकते. 

टुथपेस्ट घेऊन बटनांवर लावा, थोड्यावेळाने सुक्या कपड्याने ती पुसून काढा. बटणे चमकायला लागतील. 

लिंबू आणि मीठ यासाठी आणखी एक सोपा उपाय आहे. लिंबाचा तुकडा घ्या, त्यावर मीठ लावा आणि स्विच बोर्डाची सफाई करा. 

नेल पेंट रिमुव्हरही तुम्ही वापरू शकता. यातील अॅसिड बटणांवरील मळासोबत जमलेले किटाणू देखील संपविते. 

हे सर्व करताना तुम्ही काहीवेळासाठी घरची लाईट बंदही करा, नाहीतर शॉक लागणे किंवा शॉर्टसर्किट सारखी समस्या उद्भवू शकते. 

Click Here